मुले लहानपणी अंथरूणात लघवी करतात. ही खरंतरं सर्वसामान्य गोष्ट. पण जर तुमचे मूल वारंवार लघवी करीत असेल मग ते अंथरुणात असो वा बाथरुममध्ये. याकडे दुर्लक्ष करू नका. यात टेन्शन करण्यासारखे काही नाही, असे समजू नका. कारण ही गोष्ट तुमची चिंता वाढवणारी ठरू शकते. जी मुले दिवसा वारंवार लघवी करतात, त्यांना काही आजाराचे लक्षण असते. ही समस्या 3 ते 5 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये सामान्य आहे.मुलांमध्ये वारंवार लघवी होणे पोलाकिरीया नावाच्या आजारामुळे असू शकते. यामध्ये मुलास नेहमीपेक्षा जास्त लघवी होते. 

पोलाकिरीयाची लक्षणे

  1. मूल दर अर्ध्या तासाने लघवी करण्यासाठी जाते. 
  2. कधीकधी एखाद्याला दिवसातून 40 वेळा जावे लागते. 
  3. प्रत्येक वेळी लघवी करण्यासाठी जाताना थोडी थोडी लघवी होणे

या गोष्टींकडे कानाडोळा करू नका

  1. लघवी करताना आपल्या मुलास कोणतीही वेदना जाणवते. 
  2. तुमच्या मुलाच्या लघवीचा रंग जाड आणि गंधरस आहे. 
  3. मुलाला कपड्यांमध्ये लघवी होते. 
  4. आपल्या मुलाचे वजन खूपच कमी झाले असेल. 
  5. मूल पूवीर्पेक्षा अधिक द्रवपदार्थ पित असेल तर लक्ष द्या. म्हणजेच मुलाला जास्त तहान लागते.

लघवीवरील नियंत्रण जाणे म्हणजे मूत्राशयावरील संतुलन जाऊन लघवीमार्गातून लघवी गळत राहणे. हा आजार औषधोपचार व शस्त्रक्रियेने बरा होत असला तरी त्याचे वेळीच निदान करणे गरजेचे असते. स्त्रियांप्रमाणे मध्यमवयातील पुरुषांमध्येही या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. अनुवंशिक आजार, काही औषधांचे दुष्परिणामांमुळे, अंतर्गत संसर्गामुळे लघवीवरील नियंत्रण जाते.

लघवीच्या अनियंत्रणाचे प्रकार:

मूत्राशयावर येणारा ताण : यामध्ये सर्दी, खोकला, तसेच शारीरिक हालचालीनंतर लघवीचे नियंत्रण जाऊन लघवी होते.

मूत्राशयातील संसर्ग : यामध्ये अचानक लघवी लागून कपड्यांमध्ये लघवी होते.

स्त्रियांमधील कारणे

मेनोपॉजनंतर हार्मोन्सचे प्रमाण कमी झाल्याने जननेद्रियांचे स्नायू शिथिल होतात.

प्रसूतीनंतर या स्नायूंमध्ये शिथिलता येते तसेच स्थूलतेमुळे स्नायूंमधील क्षमता कमी झाल्याने हा आजार होऊ शकतो.

पुरुषांमधील कारणे

वयोमानानुसार प्रोस्टेट ग्रंथीची वाढ, प्रोस्टेटचा कॅन्सर अथवा जंतूसंसर्ग होतो तसेच प्रोस्टेटच्या शस्त्रक्रियेमुळे लघवीवरील नियंत्रण कमी होते.